Utkrushtatekade

Utkrushtatekade

by Jayprakash Zende

Paperback

$12.99
Choose Expedited Shipping at checkout for delivery by Thursday, August 5

Overview

अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर प्रथमच संसदेत भाषण करीत असताना मध्येच एक सद्गृहस्थ उठले आणि म्हणाले, ''लिंकनसाहेब आपले वडील माझ्या कुटुंबियांसाठी जोडे बांधीत होते हे आपण विसरता कामा नये.'' संपूर्ण संसदेत मोठाच हशा पिकला. सर्वांना वाटले लिंकनला कसे वेडे बनविले. यावर लिंकन शांतपणे म्हणाले, ''महोदय, मला माहीत आहे माझे वडील आपल्या कुटुंबासाठी जोडे बनवीत होते. आपल्या प्रमाणेच त्यांनी अनेक कुटुंबांसाठी जोडे बनविले आहेत कारण त्यांच्याइतके उत्तम जोडे दुसरे कोणी बनवू शकत नव्हता. ते स्वत: उत्पादक होते. त्यांनी बनवलेले जोडे हे फक्त जोडेच नव्हते तर त्यात ते स्वत:चे संपूर्ण हृदय, आत्मा ओतीत असत. मला आपल्याला असे विचारावेसे वाटते की, त्यांनी बनविलेल्या जोड्यांबद्दल आपली काही तक्रार आहे का? मलाही जोडे बनविता येतात. मी आपल्यासाठी दुसरे जोडे बनवून देऊ शकेन. पण माझ्या माहितीप्रमाणे माझे वडील उत्तम उत्पादक होते. त्यांच्या उत्पादनात कमतरता असणे केवळ अशक्य आहे.''
याचा अर्थ, काम कोणते हे महत्त्वाचे नाही. आपण ते कसे करता हेच अत्यंत महत्त्वाचे आहे. या पुस्तकातील अनेक गोष्टी आपले जीवन समृद्ध करायला आपल्याला उपयुक्त ठरतील आणि आपली वाटचाल 'उत्कृष्टतेकडे' करायला मदत करतील.


Related collections and offers

Product Details

ISBN-13: 9788183840538
Publisher: Repro Knowledgcast Ltd
Publication date: 01/01/2008
Pages: 170
Product dimensions: 5.50(w) x 8.50(h) x 0.36(d)

Customer Reviews